वाशिष्ठी कॅनल नदी पुलावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

rv news

 वाशिष्ठी कॅनल नदी पुलावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

⭕: पूर्वी पाच जणांचा बळी घेतलेल्या ठिकाणी पुन्हा दुर्घटना; स्थानिकांत भीतीचे वातावरण

चिपळूण- वार्ताहर 

शिरगाव – गुहागर–विजापूर मार्गावरील वाशिष्ठी कॅनल नदी पुलावर पुन्हा एकदा गंभीर अपघात झाला आहे. रात्री सुमारे 10:30 वाजता चिपळूणकडे जाणारा टँकर नियंत्रण सुटल्याने पुलावर पलटी झाला आणि या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

पलटीची चाहूल लागताच चालकाने उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र टँकर क्षणात उलटल्याने तो त्यातच अडकला आणि जागीच ठार झाला.

या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी थार गाडीचा मोठा अपघात झाला होता, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें