महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने भजनी कलावंत सदानंद देवकर यांचा सत्कार..

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने भजनी कलावंत सदानंद देवकर यांचा सत्कार..

गुहागर -(वार्ताहर)– गुहागर तालुक्यातील आरे गाव चे  गेली 30 वर्ष आरे येथे भजनाच्या माध्यमातून मनोरंजन व लोकप्रबोधनाचे काम करणारे सदानंद जगन्नाथ देवकर भजनी कलावंत गायक यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने शाल प्रशस्तीपत्रक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .त्यावेळी संस्थेचे संचालक मनोज पाटील, सल्लागार संदीप भोसले ,पोलीस पाटील मिलिंद सुर्वे ,व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.सदानंद जगन्नाथ देवकर यांना लहानपणापासूनच भजनाची आवड आहे.तसेच ते उत्तम हार्मोनियम वादक आहेत.गुहागर तालुक्यातील अनेक ठिकाणी त्यांनी भजनाचे कार्यक्रम केलेले आहेत .तालुक्यातील अनेक उत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने आज सत्कार करण्यात आला त्यामुळे तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें