अहिल्या नगर,कुर्डूवाडीत पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

 

अहिल्या नगर,कुर्डूवाडीत पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार

 

कुर्डूवाडी | प्रतिनिधी, नंदकुमार बागडेपाटील 

आज दिनांक ६ जानेवारी – पत्रकार दिनानिमित्त स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने कुर्डूवाडी शहर व तालुक्यातील पत्रकार बंधूंचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य संघटनेचे श्री माढा शहर उपाध्यक्ष आप्पासाहेब संदिपान गवळी तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे कुर्डूवाडी शहर अध्यक्ष सागर नागनाथ भोईटे यांच्या सहकार्याच्या भूमिकेतून करण्यात आले होते.

या प्रसंगी उपस्थित पत्रकार व मान्यवरांमध्ये दिव्य मराठीचे दिव्य वाळूस्कर (साहेब), नितीन वाघमारे (सर), पत्रकार विक्रम परबत, सतीश महिनगडे, पत्रकार प्रेम हनवते (साहेब), सकाळचे वसंत कांबळे (सर) यांचा समावेश होता.

तसेच समाजसेवक सुधीर भाऊ गाडेकर, युवराज भैय्या कोळी, हरिजी गोणे, ग्रामपंचायत सदस्य कैलास हनवते, अमन सुरज गायकवाड व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

पत्रकार समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम राहावा, या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा कार्यक्रम अण्णा हॉटेल, बायपास रोड, कुर्डूवाडी येथे उत्साहात पार पडला.

— जय स्वराज

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें