कु.स्वरा साळवी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय

कु.स्वरा साळवी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय.

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी चे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता गुहागर जि रत्नागिरी या प्रशालेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. स्वरा साळवी हिने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल प्रशालेतर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले.

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटात द्वितीय क्रमांक पटकावला.तसेच इयत्ता आठवी ते दहावी गटात कु तनुश्री कारेकर हिने भाग घेतला होता. तिला सहभाग प्रमाणपत्र मिळाले.या स्पर्धा जामसूत हायस्कूल येथे पार पडल्या. तिला मराठी विषयाचे शिक्षक श्री. साळुंके सर व वर्ग शिक्षक श्री. कुळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल कु स्वरा साळवी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांनी अभिनंदन केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें