पेजे महाविद्यालयातील एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी बांधला श्रमदानातून बंधारा

highlits

पेजे महाविद्यालयातील एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी बांधला श्रमदानातून बंधारा

रत्नागिरी – संदीप शेमणकर
श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिवार आंबेरे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सेवकांनी श्रमदानातून भडे या गावी बंधारा बांधून पूर्ण केला.श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार जी मोहिते सर यांच्या सामाजिक जाणीवेतून आणि प्रखर प्रेरणेतून निर्माण झालेले हे महाविद्यालय सरांच्या या समाजसेवेच्या प्रेरणेतून त्यांना अशाप्रकारे खरंच आदरांजली वाहताना दिसत आहे.स्वयंसेवकांनी अतिशय अथक प्रयत्नातून हा बांधलेला बंधारा भडे गावातील लोकांसाठी पाण्याचा एक स्त्रोत अबाधित ठेवणारा आहे.नक्कीच ग्रामवासियांना याचा लाभ होईल.भडे गावचे प्रतिष्ठित नागरिक वासुदेव आग्रे यांच्या मार्गदर्शनातून हा बंधारा पूर्ण करण्यात आला.कार्यक्रम अधिकारी कल्पना मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना या कामासाठी योग्य ती दिशा दिली.प्रत्यक्ष समाधानाच्या ठिकाणी प्राध्यापक अमित पवार,व संस्थेचे सहसचिव अविनाश डोर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या या कामाचे कौतुक सर्व स्तरावरून होत आहे.लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी भायजे साहेब सचिव राजेश मोहिते व सर्व सदस्यांनी स्वयंसेवकांना प्रोत्साहित करून त्यांचे कौतुक केले आहे.भडे ग्रामस्थांनी ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांचे कार्यक्रमाधिकारी यांनी मनःपूर्वक आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें