सुगंधा सोनू वने(SSW) फाउंडेशन आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गुहागर –
तालुक्यातील सुगंधा सोनू वने फाउंडेशन तर्फे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पाचेरी आगर येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये १४१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला होता. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली होती ५ वी ते ७ वी पर्यंतच्या गटाला माझी शाळा किंवा जलसंवर्धन काळाची गरज तर ८ वी ते १० वी पर्यंतच्या गटाला सौर ऊर्जा काळाची गरज किंवा वारकरी दिंडी हे विषय देण्यात आले होते. ५ वी ते १० वीपर्यंत या सहा वर्गातील अनुक्रमे एक ते तीन हे नंबर या ठिकाणी काढण्यात आले. सुगंधा सोनू वने फाउंडेशन श्री दालचंद वने यांच्या नेतृत्वात मुंबई शहरात मोठ्या जोमाने गेली १० वर्ष काम करत आहे.गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे अंगीभुत गुण यांचा सर्वांगीण विकास व्हावा, उच्च दर्जाचे शिक्षण त्यांना मिळावे आणि या उच्च दर्जाच्या शिक्षणातून त्यांचं भवितव्य उज्वल व्हावं या व्यापक दृष्टिकोनातून हे फाउंडेशन महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पाचेरी आगर यांना मदत करत असून याच उदात्त हेतूने ही भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. पाचेरी आगर,पाचेरी सडा, आवरे,असोरे, शिवणे,कोळवली,कुडली आबलोली तवसाळ या ठिकाणाहून स्पर्धक या सहभागी झाले होते. प्रत्येक गावातून येण्यासाठी व जाण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने सुविधा निर्माण करण्यात आली होती. चित्र काढण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य हे सुगंधा सोनू वने फाउंडेशन तर्फे देण्यात आले होते. स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी श्रेया शिवाजी साळवे, समीक्षा शिवाजी साळवे, स्वराली सुभाष जोशी इयत्ता ६ वी मध्ये आरोही रवींद्र ठोंबरे,रूनय रंजीत मालप, प्रीत अनिल जोशी इयत्ता ७ वी मध्ये शुभ्रा निलेश सुर्वे, मीरा मदन मोरे,श्रद्धा गणेश हुमणे इयत्ता ८ वी मध्ये रितेश रमेश शितप,आसावरी अंकुश हुमणे, श्रावणी राजेश वने इयत्ता ९ वी मध्ये पियुष प्रदीप शितप, साहिल संजय भुवड,सौरभ संदेश भरणकर इयत्ता १० वी मध्ये वैष्णवी दिनेश शीतप, हर्षाली दत्ताराम काताळकर,आर्यन नंदू शीतप या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे एक ते तीन नंबर पटकावले. सदर कार्यक्रमास महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामचंद्र हुमणे गुरुजी, सरचिटणीस पांडुरंग पाते,तालुक्याचे उपसभापती सन्मा.निलेशजी सुर्वे,सुगंधा सोनू वने फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मा. दालचंद वने सौ दिपाली वने,माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर,आंबेरेचे माजी सरपंच रवींद्र अवेरे, विनायक सुर्वे,वासुदेव पांचाळ, श्रीकांत पांचाळ, मुख्याध्यापक श्री पाटील सर आदीसह बहुसंख्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री साळुंखे सर, श्री सौदागर सर, अंबुलगेकर सर,साळवे सर यांनी कामकाज केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाष्टे यांनी केले. तर या भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुगंधा सोनू फाउंडेशन टीम व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
गुहागर तालुका पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांची उपस्थिती लक्षणीय. पंचायत समितीचे उपसभापती म्हणून नाही तर मुलीचे पालक म्हणून निलेश सुर्वे हे सकाळी ९.३० वाजल्यापासून संपूर्ण कार्यक्रम संध्याकाळी संपेपर्यंत म्हणजेच ३ वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित होते याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. निलेश सुर्वे यांची कन्या शुभ्रा हिने या स्पर्धेमध्ये इयत्ता ७ वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून शुभ्रा ही नवोदय विद्यालय राजापूरची विद्यार्थिनी आहे.
सुगंध सोनू वने फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशा चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरवताना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दालचंद वने सौ दिपाली वने श्री हुमणे गुरुजी, श्री पांडुरंग पाते,पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे,पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र आंबेकर.














