न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

साजरा. प्रतिनिधी (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली,ता.गुहागर जि.रत्नागिरी येथे 21 जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.बागल सर यांनी आपल्या प्रस्ताविकेतुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.दि. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला.’ निरोगी आरोग्यासाठी योग ‘ ही या वर्षी भारत सरकारने घोषणा केली आहे. असे त्यांनी सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम. ए.थरकार सर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी नियमित योगासने करावीत.मैदानी खेळ खेळावेत,योग्य आहार घ्यावा.असे आवाहन करून सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी विविध प्रकारची योगासने प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवण्यात आली. त्यामध्ये पूरक हालचाली म्हणून मानेच्या हालचाली,खांद्याची हालचाल,कंबरेच्या हालचाली, पायाच्या हालचाली,तसेच बैठक स्थितीतील असनेही विद्यार्थ्यांनी केली.कपालभाती,प्राणायाम,ध्यानस्थिती,ताडासन,वृक्षासन,वज्रासन, त्रिकोणासन,पादहस्तासन,सूर्यनमस्कार इत्यादी बैठे व खडे अशा दोन्ही प्रकारची योगासने विद्यार्थ्यांनी केली.त्यांना क्रीडा शिक्षक श्री.बागल सर यांचे मार्गदर्शन लाभले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून प्रशालेचे कला शिक्षक श्री.श्रीनाथ कुळे सर यांनी केलेले सुंदर असे फलक लेखन सर्वांचे आकर्षण ठरले होते. या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री.बागल सर यांनी केले होते.यामध्ये श्री.साळुंके सर, , श्री.गवळी सर,श्री.केळस्कर सर,,श्री.पुनस्कर सर,सौ.नाईक मॅडम, प्रा.आयरे मॅडम,सौ.कांबळे मॅडम, प्रा.सावंत मॅडम,लिपिक श्री. कदम सर,श्री.अक्षय चव्हाण, इत्यादी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व प्रशालेतील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें