पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेत रंगला आंतरराष्ट्रीय योग दिन 

पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेत रंगला आंतरराष्ट्रीय योग दिन 

 

योग प्रशिक्षिका आदिती धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर गिरवतायेत योगाचे धडे 

 

गुहागर तालुक्यातील एकमेव पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आनंददायी शनिवारचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आदल्या दिवशी योगप्रक्षिशिका आदिती धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावे तसेच निरोगी जीवनशैलीची सवय लागावी या उद्देशाने शाळेत विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आंतरराष्ट्रीय योग दिनाचे दिवशी कार्यक्रमाची सुरुवात योग दिनाच्या महत्त्वाविषयी माहिती देऊन करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कराटे ब्लॅक बेल्ट धारक शिक्षिका सुलक्षणा करडे -राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणा करून योगाचे प्रात्यक्षिके सादर केले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होण्यास मदत होते, याबाबत विद्यार्थ्यांना पीएमश्री प्रशालेचे उपशिक्षक श्री बाबासाहेब राशिनकर यांनी मार्गदर्शन केले

या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गावणंग शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विश्वजीत जामसुतकर वेळणेश्वरमधील प्रतिष्ठित ग्रामस्थ संदीप ठाकूर उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतिश नलावडे उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर सुलक्षणा करडे- राशिनकर भारती गोवेकर शिक्षण सेविका प्रियंका पवार अंजुम शेख तेजस्वीनी जगताप व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत योगासने सादर केल्याने संपूर्ण परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता.निरामय जीवनासाठी योग प्राणायाम फायदेशीर असल्याने विद्यार्थ्यांना योगाचा नियमितपणे सराव व्हावा विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी निरोगी जीवनशैलीसाठी योग अंगीकारावा या उद्देशाने पीएमश्री योग क्रीडा उपक्रमांतर्गत सातत्याने वर्षभर प्रत्येक शनिवारी पीएमश्री वेळणेश्वर नं १ प्रशालेतील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षिका आदिती धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित धडे देण्यात येत आहेत

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें