कर्तव्यनिष्ठेचा सन्मान: श्री अजित कृष्णराव ताम्हणकर यांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला पदी पदोन्नती

कर्तव्यनिष्ठेचा सन्मान: श्री अजित कृष्णराव ताम्हणकर यांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला पदी पदोन्नती

रत्नागिरी , दि. 21 जून 2026: परिवहन विभागात आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्तम नेतृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणारे अधिकारी श्री अजित कृष्णराव ताम्हणकर यांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला म्हणून पदोन्नती झाली असून, हा त्यांच्या कार्याचा अभिमानास्पद गौरव आहे. या अगोदर रत्नागिरी विभागात उत्तम प्रतीचे काम करून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागात त्यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत शासनाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. श्री ताम्हणकर यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत नेहमीच पारदर्शकता, शिस्त व नागरिकाभिमुख सेवेला प्राधान्य दिले असून, त्यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे अकोला जिल्ह्यातील परिवहन विभागाच्या कामकाजाला नवी दिशा व अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या आनंददायी प्रसंगी मित्रपरिवार, सहकारी अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच अकोलावासीयांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें