गुणवंत शिक्षकामुळेच मराठी शाळांचा दर्जा सुधारेल : सभापती प्रणव पोळेकर

highlits

गुणवंत शिक्षकामुळेच मराठी शाळांचा दर्जा सुधारेल : सभापती प्रणव पोळेकर

 

श्रृंगारतळी

 

दिनांक 21 रोजी शृंगारतळी येथील भवानी सभागृहात शिक्षक नेते कैलास शार्दुल यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकवर्ग, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना गुहागर तालुक्याचे सभापती प्रणव पोळेकर म्हणाले, गुणवंत शिक्षकांमुळेच मराठी शाळांचा दर्जा सुधारेल. आज खेड्यापाड्यातील मराठी शाळांचा पट घसरत आहे ही चिंताजनक बाब आहे. जर शिक्षकांनी मेहनत करून शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितच भविष्यकाळातील चित्र आशादायी असेल. पुढे ते म्हणाले की शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अडीअडचणी प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती कायम कटिबद्ध असेल. परंतु शिक्षकांनीही शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

 

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम, जिल्हाध्यक्ष अजय गराटे, सरचिटणीस संतोष रावणंग, गुहागर पतपेढीचे संचालक श्री चंद्रकांत झगडे, अरविंद पालकर, चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक यांचेसह बहुसंख्य शिक्षकवर्ग, मित्रपरिवार व कुटुंबीय उपस्थित होते. सेवापूर्ती निमित्त शार्दुल सरांचे चिरंजीव सिद्धेश आणि सुनबाई गौरीताई यांच्याकडून देण्यात येणाऱ्या हुंडाई वेरना गाडीची चावी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या क्षणाने सभागृहातील उपस्थित भाऊक झाले.

 

शिक्षक पतपेढीचे संचालक श्री चंद्रकांत झगडे सर हे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, शार्दुल सरांच्या सेवा कालावधीत एकूण पाच शाळा झाल्या. त्यापैकी चार शाळांना जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार मिळाले. सद्या सर शृंगारतळी येथील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा जाणवळे नं.१ येथे मुख्याध्यापक होते. तेथे त्यांनी ग्रामस्थ व पालकांना विश्वासात घेऊन भरीव असा शैक्षणिक उठाव उभा केला. शाळेच्या परिसरात झाडे लावणे, मुख्य कमान तसेच इतर भौतिक सुविधांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला. शाळेतून स्पर्धा परीक्षेत मुलं यशस्वी होण्यासाठी सरांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला चांगले यशही आले. याच शाळेतून सर 31 मे 2026 रोजी निवृत्त झाले.

 

शार्दुल सरांना शिक्षक संघटनेत काम करण्याची सुरुवातीपासूनच आवड होती आणि त्यांनी ते त्यांच्या संपूर्ण सेवा काळात केलेही. अगदी संघटनेच्या सामान्य कार्यकर्त्यापासून तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा नेते असे महत्त्वाची पदं प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून सरांनी भूषवलेली आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन ईश्वर हलगरे यांनी केले तर आभार सुनील नार्वेकर यांनी मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें