श्रीमती पार्वती वसंत घडशी यांच्या घरावर झाड पडून लाखो रुपयांचे नुकसान

राजापूर श्री मनोहर धुरी -बातमीदार
राजापूर तालुक्यातील साखर सडे चव्हाण वाडी येथील जेष्ठ महिला श्रीमती पार्वती वसंत घडशी यांच्या घरावर दिनाक 30 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता च्या सुमारास मोठे जंगली झाड पडून लाखोरुपयांचे नुकसान झाले आहे ज्यावेळी झाड पडले तेव्हा घरात कोणी नव्हते म्हणून जीवित हानी झाली नाही घराच्या मालक डॉक्टर उपचारासाठी बाहेर गावी गेल्या होत्या आज भर पावसात घरावर झाड पडल्याने श्रीमती पार्वती घडशी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे तरी संबंधित यंत्रणेने योग्य तो पंचनामा करून नुकसान भरपाई लवकरच द्यावी अशी मागणी ग्रामस्त करत आहेत















