निवृत्त नायब तहसीलदार विजय माने यांची महाराष्ट्र राज्य संघटकपदी निवड

*निवृत्त नायब तहसीलदार विजय माने यांची महाराष्ट्र राज्य संघटकपदी निवड

 

कराड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार आणि सोशल मीडिया कार्यकर्ता महासंघ यांच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदावर सैदापूर (ता. कराड, जि. सातारा) येथील निवृत्त नायब तहसीलदार विजय माने यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आयोजित राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब दखणे यांनी विजय माने यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

यावेळी राज्य उपाध्यक्ष असलम शेख (रत्नागिरी), राज्य उपाध्यक्ष दीपक मोहिते (अहिल्यानगर), जेष्ठ मार्गदर्शक प्रा. दिपक म्हस्के (बुलढाणा ), जब्बार मुजावर (कराड ),महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा दिपालीताई वाघमारे(सांगली ),राज्य कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब कांबळे(शिराळा ),संपतराव मोहिते(कराड),संतोष गायगोले, (अकोला )संतोष महादेव माने( विंग कराड), कोल्हापूर जिल्हा संघटक रियाजजमादार(गडहिंग्लज )

यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

निवडीबाबत बोलताना संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, “विजय माने हे प्रशासनाचा सखोल व गाढा अभ्यास असलेले अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे. महसूल विभागातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा संघटनेला निश्चितच लाभ होईल. माहिती अधिकार, सामाजिक प्रश्न तसेच जनतेच्या विविध प्रशासकीय अडचणी मार्गी लावण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा उपयोग होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

विजय माने यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें