शिवसेनेच्या युवासेना उपतालुका प्रमुख पदी संदेश काजरोळकर याची नियुक्ती..!
आबलोली (संदेश कदम) —-
वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्यनेते, मुख्यमंत्री मान. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख श्री. दिपक कनगुटकर, शिवसेना सचिव संतोष आग्रे यांच्या प्रेमळ आशिर्वादाने गुहागर येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच दुस-याच्या सुख- दु:खात, दुस-याच्या मदतीला अडी – अडचणीला नेहमी धाऊन जाणारे तसेच गरिबीतून व्यवसायात ठसा उमटवलेला यशस्वी व्यावसायिक , तरुण तडफदार नेतृत्व आणि गुहागर तालुक्यातील आबलोली गावचा सुपुत्र श्री. संदेश बबन काजरोळकर याची शिवसेना पक्षाच्या युवासेना उपतालुका प्रमुख (पडवे जि. प. गट) प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत चव्हाण, गुहागर तालुका प्रमुख श्री. दिपक कनगुटकर, सचिव श्री. संतोष आग्रे, तालुका समन्वयक श्री.राजेंद्र साळवी,उपतालुका प्रमुख श्री.प्रल्हाद विचारे,उपतालुका प्रमुख श्री. राजू सावरकर,श्री.महेश जामसूतकर, श्री. बबलू आग्रे, खोडदे गणाचे विभाग प्रमुख श्री. प्रकाश भोजने, मासूचे शाखा प्रमुख श्री. विजय भोजने, पडवे गणाचे विभाग प्रमुख श्री. विशाल गोताड, पडवे गणाचे उप विभाग प्रमुख श्री. योगेश पालशेतकर, जेष्ठ शिवसैनिक आणि मासूचे माजी तंटामुक्ती समीती अध्यक्ष श्री. शशि भोजने यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले आहे. शिवसेना पक्षाच्या युवासेना उपतालुका प्रमुख (पडवे जि. प. गट) प्रमुख पदी श्री. संदेश बबन काजरोळकर यांची नियुक्ती झाल्यानंतर गुहागर तालुका शिवसेना पक्षात समाधान व्यक्त करण्यात येत असून आबलोली पंचक्रोशीत जल्लोष साजरा करण्यात येत असून सर्वच स्तरातून संदेश काजरोळकर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. यावेळी वंदनीय हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असा विश्वास संदेश काजरोळकर याने व्यक्त केला.
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv