*राजापूर-कशेळी आवळीची वाडी येथे भव्य गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर 
*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
राजापूर-कशेळी (आवळीची वाडी) : आवळीची वाडी क्रिकेट संघ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गणपती सजावट स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेला वाडीतील गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक, धार्मिक व पर्यावरणपूरक संकल्पना साकारत स्पर्धकांनी आपली कलात्मकता व कल्पकता दाखवून दिली.
परीक्षक मंडळाने सजावट, संकल्पना, कलात्मकता, नावीन्य आणि सादरीकरण या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड केली.
स्पर्धेतील विजेते :
🥇 प्रथम क्रमांक — श्री. प्रसाद गणपत माळी
सजावट : ‘पंढरीची वारी’
🥈 द्वितीय क्रमांक — श्री. मधुकर पांडुरंग राडये
सजावट : ‘रामसेतू उभारणी’
🥉 तृतीय क्रमांक — श्री. नामदेव रामचंद्र वारीशे
सजावट : ‘टाकाऊपासून टिकाऊ — कागदी लगदीपासून आकाश व इंद्रधनुष्य निर्मिती’
या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सवातील कलात्मकता, सामाजिक संदेश आणि पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन मिळाले. स्पर्धकांनी विविध कल्पना प्रभावीपणे साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परीक्षक, मान्यवर, सहभागी स्पर्धक तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आवळीची वाडी क्रिकेट संघ, मुंबई यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
“एकीच आपली ताकद, क्रिकेट आपली ओळख!” या भावनेतून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा संघाचा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.












