.शुंगारतळी सीएनजी पंपावर जाणाऱ्या वाहनांच्या जानवळे फाटा येथे रांगा… अपघात घडल्यास याला जबाबदार कोण….?- विनोद जानवळकर यांचा सवाल..!

शुंगारतळी सीएनजी पंपावर जाणाऱ्या वाहनांच्या जानवळे फाटा येथे रांगा… अपघात घडल्यास याला जबाबदार कोण….?- विनोद जानवळकर यांचा सवाल..!*

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सीएनजी पंपावर वाहनांची होणारी गर्दी आता जानवळे गावातील ग्रामस्थांना अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्याच्या एका बाजूला लागत असल्याने जानवळे गावात जाणाऱ्या व येणाऱ्यां वाहकधारकांना या ठिकाणी समोरून वाहने उभी असल्यामुळे राष्ट्रीय महार्गावरील येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही.त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला असून, वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. या समस्येवर तातडीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केली आहे.

गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता कोकणवासीय मुंबई , पुणे तसेच इतर ठिकाणी परतू लागले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची संख्या वाढली

आहे. त्याचा परिणाम शृंगारतळी येथील सीएनजी पंपावरही दिसून येत असून, सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. येथील सीएनजी पंपाच्या परिसरात रस्त्यावरून जानवळे गावातील वाहनधारक व ग्रामस्थ त्यांच्यामध्ये भीतीच वातावरण होतं आहे सीएनजीसाठी उभी असलेली वाहने रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर येणाऱ्या वाहन चालकाला अंदाज घेणे कठीण होते. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आणि दुकानांसमोर वाहन उभे असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे या वाहनांच्या रांगांमुळे काही दिवसापूर्वी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनाचे नुकसान झाले होते. पंप व्यवस्थापक यांनी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे तसेच वाहतूक नियंत्रण यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी विनोद जानवळकर यांनी केली असून जर अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी व्यक्त केला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें