महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट; केंद्र सरकारकडून गंभीर दखल, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्याचा पाहणी दौरा

महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट; केंद्र सरकारकडून गंभीर दखल, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्याचा पाहणी दौरा

राष्ट्रीय कृषी संमेलनात घोषणा; दोन-तृतीयांश भूभाग प्रभावित असल्याचा केंद्र सरकारचा अंदाज

नवी दिल्ली:

महाराष्ट्रातील बिकट दुष्काळी परिस्थितीची केंद्र शासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील सुमारे दोन-तृतीयांश भूभाग दुष्काळाच्या विळख्यात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी आणि आकलन करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकासह लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

नवी दिल्लीतील पुसा येथील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘राष्ट्रीय कृषी संमेलन-रब्बी अभियान २०२६’ च्या उद्घाटन सत्रात केंद्रीय कृषिमंत्री बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर व भागीरथ चौधरी, केंद्रीय कृषी सचिव अतीश चंद्रा आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांच्यासह विविध राज्यांचे उच्चाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दक्षिण-पश्चिम भारतातील राज्यांमध्ये दुष्काळाची भीषणता वाढली आहे. कर्नाटकात आगामी ३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय पाहणी पथक दाखल होणार असून, त्या पाठोपाठ केंद्रीय पथक महाराष्ट्रातील बाधित क्षेत्रांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार असल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.

पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित रब्बी पीक नियोजनाचे आवाहन

महाराष्ट्रातील पाणीटंचाईची तीव्रता पाहता आगामी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन हे जलसाठ्याच्या उपलब्धतेवर (वॉटर बजेटिंग) आणि जमिनीतील ओलाव्यावर आधारित असावे, असे निर्देश कृषिमंत्री चौहान यांनी दिले.

* कमी पाण्याच्या पिकांना प्राधान्य: तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागात कमी पाण्यावर येणाऱ्या कडधान्य आणि तेलबिया पिकांची पेरणी करावी.

* जास्त पाण्याची पिके टाळावीत: सिंचनाची पुरेशी सुविधा नसताना जास्त पाण्याची गरज असणारी पिके घेतल्यास नंतर पीक वाया जाण्याचा मोठा धोका असतो.

* वेळेत पेरणीचे आवाहन: हवामान बदलामुळे पेरणीला विलंब झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि आवश्यक निविष्ठांची आधीच पूर्वतयारी करून वेळेत पेरणी पूर्ण करावी.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें