गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट या विद्यालयातील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत इ.८वी मधील
🔹 *कु.उमर शोएब खतीब चा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
▫️पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा
चिपळूण : वार्ताहर (योगेश पेढांबकर)
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूलमधील इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. उमर शोएब खतीब याने पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. उमरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व मित्रपरिवाराकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सदर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी विद्यालयातील माध्यमिक शिक्षक व मराठी विषय शिक्षक श्री.योगेश तानू पेढांबकर यांचे विशेष मार्गदर्शन लागले.
या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याचीही प्रशंसा होत आहे.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री.डॉ.इसहाक खतीब, व्हाईस चेअरमन श्री. जफर कटमाले, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरूसा खतीब, संस्थेचे सेक्रेटरी मुजाहिद मेयर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.इरफान शेख, उप मुख्याध्यापक श्री. इम्रान महत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिनियम विशेष कौतुक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गोवळकोटच्या उमर खतीबचा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक
पूज्य गांधी प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेत इयत्ता आठवीतील उमर शोएब खतीबचे उल्लेखनीय यश; शिक्षक योगेश पेढांबकर यांचे मार्गदर्शन












