श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा.

श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा.

गुहागर : श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे हिंदी दिवस समारोह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुजाता कांबळे मॅडम यांनी केले. त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या समृद्ध परंपरेची माहिती दिली.
हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
इयत्ता पाचवी ते सातवी गटातील विजेते
प्रथम क्रमांक : कुमारी अवनी मिलिंद सर्वे – ७ वी ‘अ’
द्वितीय क्रमांक : कुमारी तीर्था सुशांत संसारे – ६ वी ‘ब’
तृतीय क्रमांक : कुमारी स्वरा प्रथमेश दामले – ५ वी ‘अ’
इयत्ता आठवी ते दहावी गटातील विजेते
प्रथम क्रमांक : कुमारी विभा विकास मालप – ९ वी ‘अ’, कुमारी करुणा समीर जागुष्टे – ९ वी ‘क’
द्वितीय क्रमांक : कुमारी क्षमा अनंत घाडे – १० वी ‘क’, कुमारी शर्वरी संदीप सांगळे – ९ वी ‘क’
तृतीय क्रमांक : कुमारी सायुरी मनोज तेलगडे – १० वी ‘क’, कुमारी शर्वरी शांताराम जावळे – ९ वी ‘क’
उत्तेजनार्थ : कुमारी अरणी राधेश्याम घाडे – ८ वी, कुमारी पूर्वी सुजित शिंदे – ९ वी ‘अ’
कार्यक्रमास विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. कनगुटकर मॅडम, हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ. खानविलकर मॅडम, सौ. माने मॅडम तसेच श्री साबळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी कविता वाचन, भाषण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि अभिमान निर्माण झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, हिंदी विषय शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण हिंदी दिवस समारोह उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें