तळवली आरोग्यवर्धिनी केंद्राला सभापती – उपसभापतींची भेट, आरोग्य सेवेचा आढावा घेत सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना

*तळवली आरोग्यवर्धिनी केंद्राला सभापती – उपसभापतींची भेट,

*आरोग्य सेवेचा आढावा घेत सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना

आबलोली (संदेश कदम)

पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी शुक्रवारी तळवली आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्यसेवेचा आढावा घेतला.

तळवली आरोग्यवर्धिनी केंद्र हे तळवली पंचक्रोशीतील गावांना सेवेसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. कोट्यवधीचा निधी खर्चून याठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून आरोग्यवर्धीनी मंदीर उभारण्यात आले आहे. सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी शुक्रवारी याठिकाणी भेट देऊन येथील आरोग्य सेवेची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी येथील आरोग्य सेवेत आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.तसेच आलेल्या रुग्णांची विचारपूस करून आपल्याला मिळणारी सेवा कश्या प्रकारे दिली जात आहे याबाबतही चौकशी केली.

याठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुधारणा करून अधिकाधिक चांगली सेवा कश्या प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या सूचना यावेळी सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी येथील वैद्यकीय अधिकारी प्रफुलकुमार कांबळे यांना दिल्या.यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे व भाजपचे तालुका सेक्रेटरी सचिन ओक, डॉ.भारत शेळके,आरोग्य सहाय्यक मदन जानवळकर आदी. उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें