उमेद अभियान कायम करा – महिला मोर्चाने गुहागर दणाणले..

उमेद अभियान कायम करा – महिला मोर्चाने गुहागर दणाणले..

उमेद अभियान कायम करा – महिला मोर्चाने गुहागर दणाणले.. .. छाया – संदेश कदम

!

आबलोली (संदेश कदम) …….

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून अस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी शासनाच्या समकक्ष पदावर कायम स्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे आणि समुदाय संसाधन व्यक्ती (उदा: आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या प्रमाणे) शासकीय दर्जा मिळाला पाहिजे तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागा मधील शासनाचा एक नियमित भाग म्हणून अस्थापनेला मान्यता दिल्यास ग्रामीण भागातील ८४ लाख कुटुंबामध्ये(शासना बाबत) आपल्या बाबत आदर निर्माण होऊन सदरील निर्णयातून शासनाचा विश्वास वाढून सकारात्मकता निर्माण होणे मदत होईल आदी. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण राज्यासह आंम्ही दि. ०३ /१०/२०२४ पासून अधिकारी, कर्मचारी आणि सर्व केडर सहकुटुंब बेमुदत संपावर जात आहोत आंम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारचे उमेद अभियान महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना जिल्हा रत्नागिरी, गुहागर तालुका स्तरीय अधिवेशन तथा मागणी जनजागृती मेळावा नुकताच गुहागर येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी पंचायत समिती गुहागर येथून उमेद च्या५००० महिला घोषणा देत तहसीलदार कार्यालय यावेळी तहसीलदार साहेब,पोलिस निरीक्षक,गुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव यांना निवेदन देण्यात आले.व त्यानंतर भंडारी सभागृह येथे शिस्तबध्द पध्दतीने रॅली काढण्यात आली. त्यानंतर या भव्य दिव्य रॅलीचे सभेत रुपांतर झाले. यावेळी उमेद कर्मचारी संघटना गुहागर तालुका अध्यक्ष श्री. राकेश भास्कर हळदणकर, सचिव अंकिता पाटील,पदाधिकारी दुर्वा ओक, राहिला बोट, केडर संघटना गुहागर तालुका अध्यक्ष मंजिरी जाधव, उपाध्यक्ष नम्रता भेकरे, सचिव स्वरांगी पड्याळ यांचेसह उमेदचे अधिकारी, पदाधिकारी, बचतगटाच्या सीआरपी, बॅंकसखी,बचतगट सभासद ५००० महिला गुहागर तालुक्यातून सहभागी झाल्या होत्या.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें