महाविकास आघाडी विकासाचा शत्रू; – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाविकास आघाडी विकासाचा शत्रू; – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाविकास आघाडी विकासाचा शत्रू; – पंतप्रधान नरेंद्र मोदी

ठाणे : राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना रोखण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. अहंकारापोटी मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प तसेच दुष्काळी भागात पाणीपुरवठ्याचे प्रकल्पही रोखले. अशा महाविकासविरोधी आणि विकासशत्रू असलेल्या महाविकास आघाडीला रोखण्याचे काम तुम्ही करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केले.

काँग्रेस पक्ष हा लूट, भ्रष्टाचार आणि कुशासनचे ‘पॅकेज’ असल्याची टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सूड उगवण्याचे काम करेल आणि राज्याचा विकास रोखेल असे सांगताना राज्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महायुतीच्या सरकारला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

घोडबंदर येथील कासारवडवली भागातील वालावलकर मैदानात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडला. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोडबंदर येथील कासारवडवली भागातील वालावलकर मैदानात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडला

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें