‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!

‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता

 सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला

मुंबई –   ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यंदा २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरवर्षी हा शो शंभर दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मात्र, यावर्षी अवघ्या ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला जाणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूहात सहभाग घेतला होता. या १६ जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत निभाव लागला.

प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवत यंदा अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले सध्या दणक्यात सुरू आहे. आतापर्यंत जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी या सदस्यांनी या खेळातून निरोप घेतला आहे. त्यामुळे यंदाचे टॉप-२ ठरले सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत. यानंतर दोघांनी घराचे दिवे बंद करून मंचावर एन्ट्री घेतली. शेवटी रितेश देशमुखने सूरज चव्हाण यंदाचा विजेता झाल्याचं जाहीर केलं.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें