रत्नागिरी मेंटल हॉस्पिटल- आंदोलकांनी केलेली निदर्शने आणि त्याचा घेतलेला धसका

रत्नागिरी मेंटल हॉस्पिटल- आंदोलकांनी केलेली निदर्शने आणि त्याचा घेतलेला धसका!

 

  रत्नागिरी (वार्ताहर );

पाच जिल्ह्याचे केंद्रीय बिंदू असणारे आणि सुमारे 14 एकर जागेत गेली 138 वर्ष दिमाखात पाय रोवून उभं असलेलं प्रादेशिक मनोरुग्णालयाचं कंबरड मोडून ती जागा हडप करण्यासाठी बाजी लावणाऱ्या पुढाऱ्याला गेली वीसवर्षे  रत्नागिरीकर चांगलेच ओळखत असून एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर फिरवणाऱ्या चा

Ratnagiri vartahar
Ratnagiri vartahar

हेतू माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीतुन लपू शकलेला नाही असं विधीतज्ञ अश्विनी आगाशे,रूपाली सावंत,युयुत्सु आर्ते, मिलिंद किर,आणि राजेंद्र आयरे,यांनी म्हटलं आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालय जयसिंगपूरला जाण्याची दिशा दाखवणाऱ्या आणि, विकासाचे मनोरे रचणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील एका स्थानिक पुढाऱ्याच्या निषेध करण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली.

निदर्शनाची बातमी सोशल मीडियावर प्रसारीत होताच काळजाचं पाणी पाणी झालेल्या त्या पुढार्‍याच्या हस्तकाने आगाशे यांच्याशी संपर्क साधत, तुम्हाला मिळालेली माहिती खोटी असून हे रुग्णालय कुठेही जात नसल्याची स्पष्ट कबुली दिली.

मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली.असा हा बहुरूपी पुढारी कुठलही प्रकरण आपल्या अंगलट येणार नाही याची चाणाक्ष पणे दक्षता घेत दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडत असतो. म्हातारी मेल्याचं दुःख नसून काळ सोफावतो आहे याचं फक्त वाईट वाटतं.

विकासाच्या नावाखाली रत्नागिरीचे लचके तोडणारे असे पुढारी जर निवडणुकीत उभे राहिले तर त्यांना निवडून द्यायचं का? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें