आमदार भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा साठी उमेदवारी अर्ज केला दाखल

आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा साठी उमेदवारी अर्ज केला दाखल

तळवली.(मंगेश जाधव)– आमदार भास्कर जाधव यांनी प्रथम गुहागर शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने आपल्या गुहागर येथील कार्यालयाजवळ आल्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत व्याघ्रेश्वराचे सहपत्नी दर्शन घेतले. तिथून काही मोजक्याच कार्यकर्त्यां समवेत आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तहसील कार्यालय येथे जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सुवर्णाताई जाधव, मुलगा समीर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, आरपीआयचे सुभाष मोहिते आधी उपस्थित होते. नंतर त्यांनी बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें