स्वीप उपक्रमा अंतर्गत मतदार जनजागृती भव्य बाईक रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद….पथनाट्याचे आयोजन…प्राथमिक शिक्षकांचा स्वयंस्फूर्तीने भव्य प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वीप उपक्रमा अंतर्गत मतदार जनजागृती भव्य बाईक रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद….पथनाट्याचे आयोजन…प्राथमिक शिक्षकांचा स्वयंस्फूर्तीने भव्य प्रतिसाद

गुहागर – विधानसभा सार्वजनिक निवडणूक 264 गुहागर विधानसभा स्वीप उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची मतदार जनजागृती भव्य बाईक रॅली निवडणूक निर्णय अधिकारी ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आदेशाने व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर चे रायचंद गळवे यांचे मार्गदर्शनाखाली आर पी पालशेतकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ते गुहागर तहसीलदार कार्यालय मैदान ते शृंगारतळी पेट्रोल पंप अशी भव्य बाईक काढून मतदार जनजागृती करण्यात आली.सदर रॅलीचे नेतृत्व गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांनी केले.त्यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष रवींद्र कुळे, अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मनोज पाटील ,प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बेलेकर ,प्राथमिक शिक्षक समितीचे माजी तालुका सरचिटणीस नरेंद्र देवळेकर ,अपंग प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम ,तज्ञ मार्गदर्शक दिनेश जाक्कर ,प्रताप देसले, लक्ष्मण लोहकरे ,तुषार लोहार ,विनोद कदम ,नितीन काकडे ,पंचायत समिती विषय शिक्षक वनाळे सर व तालुक्यातील सुमारे 180 शिक्षक बंधू भगिनी सहभागी झाले होते.त्यावेळी नवनियुक्त शिक्षण सेवक यांनी मतदार जनजागृती विषयक पथनाट्य सादर केले.त्यानंतर पालशेत हायस्कूल, पालशेत बाजारपेठ ,मोडकागर ,गुहागर एसटी स्टँड ,गुहागर तहसीलदार कार्यालय ,शृंगार तळी पेट्रोल पंप या दरम्यान प्राथमिक शिक्षकानी उस्फूर्तपणे बाईक रॅली आयोजित करून,मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन केले .पालशेत बाजारपेठ ,गुहागर एसटी स्टँड व रहदारीच्या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम सादर केले.सदर बाईक रॅली गुहागर तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून घेत होती .त्यावेळी उपस्थित नागरिक यांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब म्हणाले की विधानसभा सार्वजनिक निवडणुकीमध्ये सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजवावा,.आपली लोकशाही बळकट करावी, मतदानाचा पवित्र हक्क बजावून, आपले कर्तव्य पूर्ण करावे.भारत सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे ,मतदान करणे ही आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे.मतदार बाईक रॅलीमध्ये भाग घेणाऱ्या सर्व शिक्षकांना त्यांनी धन्यवाद दिले.त्यावेळी नितीन काकडे व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.बाईक रॅलीच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षण अधिकारी रायचंद गळवे व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांनी प्रयत्न केले. पंचायत समिती शिक्षण विभागाअंतर्गत मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन केल्याबद्दल गुहागर तालुक्यातील जनतेकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई