महाविकास आघाडीची सत्ता येताच पुनर्विकासाला प्रथम प्राधान्य – सचिन अहिर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीची सत्ता येताच पुनर्विकासाला प्रथम प्राधान्य – सचिन अहिर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्प्रिंग मिल इमारत पुनर्बाधणी, टाटा मिल किंवा कोहिनूर मिल चाळींच्या पुनर्विकासा बरोबरच मुंबईतील खासगी तसेच सरकारी गिरण्यांच्या जमिनीवर असलेल्या चाळींच्या पुनर्विकासाचे प्रश्न, महाविकास आघाडीचे‌ सरकार सत्तास्थानी येताच प्राधान्याने सोडविण्यासाठी भूमिका घेईल, अशी ग्वाही शिवसेना उपनेते, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी गिरण्यांच्या चाळींच्या भेटी प्रसंगी दिली. वरील चाळींच्या रहिवाशांनी सचिनभाऊ अहिर यांच्याकडे भेटीसाठी आग्रह धरला होता. आजच्या भेटीप्रसंगी रा‌ष्ट्रीय मि‌ल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, विभागिय (ठाकरे) शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला पांचाळ, पवन श्रीधर जाधव, माजी नगरसेवक अरुण नरे, सुनिल अहिर आणि संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार नेते, शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी आज परळ येथील टाटा मिल चाळ कंपाऊंड, नायगाव येथील स्प्रिंग मिल चाळ आणि नायगाव मधीलच कोहिनूर मिलच्या चाळींना भेटी दिल्या आणि रहिवाशी तसेच संबंधित कमिटीच्या पदाधिकार्‍यांशी सद्यपरिस्थिती विषयी चर्चा केली.

स्प्रिंग मिलच्या लांबत चाललेल्या घरांच्या प्रश्नावर प्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे सांगून आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, स्प्रिंग मिलच्या पुनर्वसनाचा प्रश्न अकारण लांबविण्यात आला आहे. या प्रश्नाची त्वरित सोडवणूक झाली पाहिजे, असे स्प्रिंग मिल भाडेकरू संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा मांडतांना सांगितले.

एनटीसी मालकीच्या नायगाव येथे मोडकळीस आलेल्या‌ कोहिनूर चाळींमधील ९०० ते १००० कुटूंबाच्या भवितव्याचा प्रश्न आज अधांतरीत असून, या प्रश्नावर राज्य सरकारने अकारण वेळेचा अपव्यय केला आहे, असे भाडेकरुंनी सांगितले. मुंबईतील सर्वच खाजगी तसेच एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींच्या पुनर्वसनाचा प्रश्न म्हाडा योजने अंतर्गत सोडविता येऊ शकतो. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेत्यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही सचिनभाऊ अहिर यांनी भाडेकरूंना सांगितले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका सर्व नियामक नियमांचे काटेकोर पालन आणि अत्याधुनिक 'क्लोज्ड-लूप' प्रणालीचा...
Read More
लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप...
Read More
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

"स्वातंत्र क्रिडा मंडळ" भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे...
Read More
स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय - लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार आबलोली...
Read More
नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार