राज्यात तळीरामांचे वांदे! एक-दोन नाही सलग ४ दिवस ड्रायडे(Dry Day) घोषित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात तळीरामांचे वांदे!

 

 एक-दोन नाही सलग ४ दिवस ड्रायडे(Dry Day) घोषित

 

या’ दिवशी मद्यविक्री बंद

 

महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा २०२४ निवडणुकीच्या रणधुमाळीमधील महत्त्वाचा दिवस आहे.

 

राज्यामध्ये २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान असल्याने प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजता थंडावत आहेत.

 

मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप, बैठका, रोड शो, जाहीर सभा या सर्वांना सायंकाळी सहानंतर ब्रेक लागणार आहे.

 

विशेष म्हणजे प्रचार संपण्याबरोबरच मतदानाआधी म्हणजेच १८ तारखेला प्रचाराची काळमर्यादा संपल्यापासून म्हणजेच सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंद केली जाईल.

 

विधानसभा २०२४ निवडणुकीच्या महिन्यामध्ये राज्यात एकूण चार दिवस ड्राय डे असणार आहे.

 

हे दिवस कोणते आणि काय निर्बंध असणार पाहूयात*

 

 मात्र त्यापूर्वी राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम कसा आहे जाणून घेऊयात

 

असा आहे निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम

 

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे.

 

या निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे.

 

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोंबर २०२४ होती

तर ३० ऑक्टोबर २०२४ला अर्जांची छानणी झाली.

 

अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत होती.

 

२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

 

२५ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल,

असं निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात म्हटलं आहे.

 

ड्राय डे कधी असणार?

 

१८ तारखेला प्रचार संपल्या संपल्या सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी असेल.

 

१९ तारखेला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० तारखेलाही राज्यात ड्राय डे असेल.

 

त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद असेल.

 

म्हणजेच महाराष्ट्रामध्ये १८, १९, २० आणि २३ असे चार दिवस मद्यविक्री बंद असणार आहे.

 

नेमकी ही मद्यविक्री बंदी कधी आणि कशी असेल पाहूयात…

 

१८ नोव्हेंबर २०२४ : सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंद केली जाईल.

 

१९ नोव्हेंबर २०२४ : मतदानाच्या आधीचा दिवस म्हणून संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद असेल.

 

२० नोव्हेंबर २०२४ : निवडणुकीचा दिवस असल्याने मद्यविक्री दिवसभर बंद राहणार आहे.

 

२३ नोव्हेंबर २०२४: मध्यरात्री १२ वाजता दिवस सुरु होतो तिथपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निवडणूक आयोग निकालाची घोषणा करत नाही तोपर्यंत मद्यविक्री बंद असणार आहे.

 

या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते.

 

एखाद्या व्यक्तीकडे या कालावधीमध्ये विनापरवाना मद्यसाठा आढळून आल्याच्या त्याच्याविरोधातही कठोर कारवाई केली जाते.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound