मुंबई-गोवा महामार्गावर वांद्रीजवळ मुंबईहुन राजापूर ला मतदारांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर वांद्रीजवळ मुंबईहुन राजापूर ला मतदारांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात

 

संगमेश्वर -(वार्ताहर )-  मुंबईहून राजापुरात मतदानासाठी जाणाऱ्या

खाजगी बस आणि व्हॅगनार गाड्यांचा अपघात झाला. हा अपघात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री येथे व्हॅगनार कारने लक्झरीला धडक दिल्याने झाला.

 

या अपघातात व्हॅगनार कार मधील महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे.

व्हॅगनार MH 04 FZ 4247 वेंगुर्ले हून डोंबिवली च्या दिशेने वाहन चालक शेखर गणपत दाभोलकर वय 54 हे घेऊन जात होते. त्याच वेळी समोरून लक्झरी MH 01C 0734 मुंबईतून राजापूरला जात असताना मुंबई गोवा महामार्गावर वांद्री भंडारवाडी येथे हा अपघात सकाळी 8.30 वाजता झाला. बस मुंबईतून राजापूरला मतदान साठी मतदारांना घेऊन जात होती.

 

याचवेळी रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने कार चालली होती. वांद्री येथे कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने लक्झरिला समोरून धडक दिली. यामध्ये लक्झरीचे दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर येथील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें