राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत काताळे गावचा सुपुत्र बाल चित्रकार कु.वेदांत अशोक डिंगणकर याचा सन्मान ऊर्जा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत काताळे गावचा सुपुत्र बाल चित्रकार कु.वेदांत अशोक डिंगणकर याचा सन्मान

ऊर्जा मंत्रालय-भारत सरकारच्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकला

आबलोली (संदेश कदम) …..

ऊर्जा संरक्षण पर राज्य स्तरीय चित्रकला प्रतियोगिता (STATE LEVEL NATIONAL PAINTING COMPETITION ON ENERGY CONSERVATIVE-2024)

देशांतर्गत क्षेत्रातील ऊर्जा,कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धनासाठी संवेदनशील करण्यासाठी ऊर्जा मंत्रालय (MOP)व भारत सरकार (GOI), यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत, चारही बाजूंनी निसर्ग रम्य वातावरणात वसलेले ग्रामीण भागातील, खेडेगावातील छोटेसे गाव म्हणजे काताळे या गावांमध्ये एक आदर्श शाळा ती म्हणजे, जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा काताळे नंबर .०१ या जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा काताळे नंबर.०१, तालुका- गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथील विद्यार्थी कु.वेदांत अशोक डिंगणकर, इयत्ता -७ वी मध्ये शिक्षण घेत आहे.वेदांत हा महाराष्ट्र राज्यातून टॉप ५० मध्ये निवड करण्यात आली.आणि वेदांत ने शाळा, गाव, तालुका, जिल्ह्यासह आपल्या आईवडिलांचे आणि शाळेच्या मार्गदर्शक शिक्षकांची नावे यशोशिखरावर नेली.

वेदांत आणि टॉप ५० मधील विद्यार्थ्यांची मुंबई मध्ये १४ नोव्हेंबर -२०२४ सकाळी ७.०० वाजता, SNDT COLLEGE MUMBAI येथे राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतमध्ये 828(आठशे अठ्ठावीस ) शाळांनी यामध्ये सहभागी झाले होते.या स्पर्धेतमध्ये- A GROUP मधून 21824 (एकविस हजार आठशे चौवीस) हून अधिक चित्रकार मुलांनी भाग घेतला होता. यामधून राज्यस्तरासाठी टॉप 50 मुलांची निवड करण्यात आली या राष्ट्रीय स्पर्धेत मध्ये वेंदातने आपली चुणूक दाखवून त्याला राष्ट्रीय स्तराचे प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.यावेळी NTPC कंपनी चे रिजनल हेड ऑफ एच आर वंदना चतुर्वेदी, परीक्षक पूनम परालकर,नीलम केनी, मिरा सावंत,तसेच सदस्य जी. जी.वाघमारे, संदिप संगवे उपस्थित होते.वेदांतला बालपणापासून चित्रकला विषयांची आवड होती.आपल्या कलेची जोपासना करत जिद्द चिकाटी यांच्या जोरावर त्यांने राष्ट्रीय स्तरावर सुयश संपादन करत आपल्या काताळे गावांचे नांव, आपल्या शाळेचे नाव,आई वडील, शिक्षकांचे नाव रोशन केले आहे.वेदांतचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. वेदांत ने आपली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवस रात्र मेहनत करून यशस्वीपणे आपले ध्येय पूर्ण केले.या यशामध्ये मागदर्शन गुरुवर्य म्हणून शिक्षक आदरणीय, मुख्याध्यापिका

श्रीमती. माधवी पाटील श्री.सोनवलकर सर, चव्हाण सर, कांबळे सर, यांनी खूप सहकार्य करून सर्व गोष्टी वेदांतकडून करून घेतल्या.या मध्ये नेहमीच सातत्याने जेथे स्पर्धा परीक्षा, सत्कार समारंभ असतील तेथे जाणे,येणे या सर्व गोष्टी शिक्षक वर्ग मोठ्या आपुलकीने करत असतात.

या स्पर्धेतमध्ये सहभागी का व्हावे तर,ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक कौशल्यांचा शोध घेण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करते आणि राष्ट्रीय कारणासाठी योगदान देते- ऊर्जा संवर्धन हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांनाच शिक्षित करत नाही तर त्यांच्या कुटुंबांना आणि

समुदायांमध्येही जागरूकता वाढवतो. त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तींद्वारे, विद्यार्थी शाश्वत आणि ऊर्जा-कार्यक्षम भविष्यासाठी राजदूत बनतात.

जगभरातील नाविन्यपूर्ण तसेच वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक प्रतिमेला आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देणे ,या उद्देशाने खुप महत्वाचे पाऊल उचलले जाते.

“तुमच्या विद्यार्थ्यांना या प्रभावशाली स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा आणि ऊर्जा संवर्धनाचा संदेश देशभर पसरवण्यात मदत करा..!”हाच संदेश वेदांत याने चित्रकला मधुन दिला.त्याच्या या यशाबद्दल काताळे शाळा व्यवस्थापन समिती निर्मल ग्रामपंचायत काताळे,काताळे शाळा शिक्षण वर्ग – पालक वर्ग तसेच गुहागर तालुका गटशिक्षण अधिकारी श्री. नितीन गळवे साहेब ,बीट विस्तार अधिकारी श्री. विश्वास खर्डे, पडवे उर्दू केंद्रप्रमुख श्री . परवेज चिपळूणकर, या सर्वांनी कु. वेदांत अशोक डिंगणकर याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

???? Plz Join whatsup group ????????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन