माझ्या मालमत्तेचे हेतू पुरस्कर नुकसान करत असले बाबत संदेश साळवी यांचा पोलिस निरीक्षक, तहसीलदार गुहागर यांना लेखी अर्ज
तळवली (वार्ताहर)…..
गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायत हद्दीतील माझ्या मालकीच्या भूमापन क्रमांक १५०५ मध्ये हेतू पुरस्कर नुकसान काही ग्रामस्थांकडून सतत होत आहे दिनांक ९/१२/२०२४ च्या रात्री माझ्या शेतातील नारळ, पोफळ इतर झाडे मुळापासून मोडून टाकून शेत उध्वस्त करण्यात आले आहे. दि. ३/१२/२०२४ या दिवशी गट क्रमांक १५०५ मध्ये आबलोली गावातील चार शेतमजूर व मी स्वतः शेतात काम करत असताना दि. ३/१२/२०२४ या दिवशी दुपारी तीन वाजता दोन संशयित व्यक्ती माझ्या गट क्रमांक १५०५ च्या शेजारी उभे राहून माझ्या जागेची संशयित रित्या पाहणी करत असताना आंम्ही त्यांना पाहिले आहे. त्याचबरोबर आणखी एक संशयित व्यक्ती नेहमी माझ्या शेताची संशयितरित्या पाहणी आंम्ही पाहत आहोत. तरी या तिघा संशयित व्यक्तींवर माझ्या पूर्ण संशय आहे. या तिघा व्यक्तींनीच मिळून हे कृत्य केल्याचा मला खात्रीशीर संशय आहे तरी आपणाकडून स्थळ पाहणी होऊन गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई व्हावी असा विनंती अर्ज आणि मालमत्तेचे नुकसान झालेल्या जागेचे फोटो सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोलीचे संचालक आणि भूमापन क्रमांक १५०५ चे जागा मालक संदेश गजानन साळवी यांनी पोलिस निरीक्षक गुहागर आणि तहसीलदार कार्यालय गुहागर यांना लेखी अर्ज दिला आहे















