मोफत प्रशिक्षणातून स्वयंरोजगार, नोकरीची संधी”माजी मंत्री सुरेश प्रभू यांचा उपक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत प्रशिक्षणातून स्वयंरोजगार, नोकरीची संधी”

माजी केंद्रीय मंत्री मा़. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुपुत्रांच्या विकासासाठी मानव साधन विकास संस्था करीत असलेले कार्य अत्यंत स्तुत्य असेच आहे.

कोकण किनारपट्टीचे वाढते पर्यटन महत्व लक्षात घेऊन सिंधुपुत्रांना या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे़.

मानव साधन विकास संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ़. उमा सुरेश प्रभू यांचे मार्फत या वर्षी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील 120 मच्छीमार सिंधुपुत्रांना ‘राष्ट्रीय जल क्रीडा संस्थान ‘ (NIWS) दोनापावला,गोवा येथे वॉटर स्पोर्ट्स चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन अधिकृत परवाना व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
मानव साधन विकास संस्था ही शेतकरी, महिला, मच्छीमार, युवा, माजी सैनिक व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. पर्यटनाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार युवकांसाठी मानव साधन विकास संस्था संचलित *परिवर्तन केंद्र, सिंधुदुर्ग* आणि *आय.सी. आय. सी. आय.* *फाउंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ *सिंधुपुत्र* ‘ हा उपजीविका निर्मितीक्षम कार्यक्रम *ऑक्टोबर 2023* ते *मे 2024* दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत *लाईफ सेविंग स्किल्स् (वॉटर स्पोर्ट्स) आणि पाँवर बोट हँडलिंग (टिलर) यांचे प्रशिक्षण* आतापर्यंत 120 युवक युवतींना देण्यात आले.

या प्रशिक्षणातील काही युवक गोवा येथे ‘लाईफ गार्ड’ म्हणून नोकरी करत आहेत. तर काहीजणांनी वॉटर स्पोर्ट्स मध्ये आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. काही युवक पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहेत. यापैकी काही प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागा अंतर्गत ‘ सागरमित्र ‘ या पदावर शासकीय सेवेत कार्यरत आहेत.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील अजून 80 युवक युवतींना प्रशिक्षित करण्याचा मानव साधन विका्स संस्थेचा मानस आहे.
” डिसेंबर 2024 प्रशिक्षणाची संधी ”
डिसेंबर 2024 अखेर आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणासाठी *पात्र इच्छूकांनी आपली नाव नोंदणी दिनांक 20 डिसेंबर 2024* पर्यंत करण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
प्रशिक्षण नोंदणीसाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे
1) श्री. विलास हडकर
9421146062.
2) श्री. संजय नाईक
9921927168.

प्रशिक्षण घेतलेल्या निवडक प्रशिक्षणार्थीसाठी  स्कुबा डायविंग ‘ प्रशिक्षण आयोजित करण्याचा संस्थेचा विचार आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam