परभणीतील प्रकार -संविधान प्रतिची विटंबना करणाऱ्या नराधमास फाशी द्या.बौध्दजन पंचायत समितीची मागणी

परभणीतील प्रकार -संविधान प्रतिची विटंबना करणाऱ्या नराधमास फाशी द्या.बौध्दजन पंचायत समितीची मागणी

तळवली (मंगेश जाधव)-परभणी येथे झालेल्या विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळील संविधान शिल्पाची तोडफोड प्रकरणी तसेच परभणी जिल्ह्यातील बौद्ध तरुणांवर कोंबिंग ऑपरेशन करून त्यांमाना अटक करण्यात आली. सदर प्रकरणात शिक्षित तरुण सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीत पोलीस कस्टडीतच मृत्यू झाला. या जुल्मी घटने बद्दल तिव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला यॊग्य तो न्याय मिळण्यासाठी तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे व संविधानाचा सन्मान ठेवावा

परभणीतील प्रकार -संविधान प्रतिची विटंबना करणाऱ्या नराधमास फाशी द्या.बौध्दजन पंचायत समितीची मागणी

या करीता बौद्धजन पंचायत समिती गोरेगाव गट क्रमांक २७ च्या वतीने गट प्रतिनिधी राजेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय समितीचे पदाधिकारी व सर्व शाखांचे पदाधिकारी यांच्या वतीने गोरेगाव पोलीस ठाणे तीन डोंगरी गोरेगाव (पश्चिम ) या ठिकाणी एक निवेदन देण्यात आले. सदर वेळी गोरेगाव मधील सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें