६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

मुंबई-२ केंद्रातून ‘मोक्ष’ प्रथम

 

मुंबई-२ केंद्रातून ‘मोक्ष’ प्रथम

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-२ केंद्रातून श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या ‘मोक्ष’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच माणूस फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘द फिलिंग पॅराडॉक्स’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-२ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा या संस्थेच्या ‘हायब्रीड’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक रमाकांत जाधव (नाटक- मोक्ष), द्वितीय पारितोषिक डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- मोक्ष), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक-१९६० रोजी), नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रदीप पाटील (नाटक-मोक्ष) द्वितीय पारितोषिक केतन दुधवडकर (नाटक- रेड अंब्रेला), रंगभूषा प्रथम पारितोषिक वासुदेव आंब्रे (नाटक- जगज्जेता), द्वितीय पारितोषिक उल्लेश खंदारे (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक महेंद्र कुरघोडे (नाटक- मोक्ष) व नेहा अष्टपुत्रे (नाटक- पूर्णविराम), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शिवानी पेडणेकर (नाटक- हायब्रीड), प्रेरणा खेडेकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), तेजश्री दाभोळकर (नाटक- म्याडम), भारती परमार (नाटक- मोक्ष), प्रथमेश भाट (नाटक-मोक्ष), डॉ. सोमनाथ सोनवलकर (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स), अक्षय भोसले (नाटक – शोकांतिकेची रात्र), निनाद चिटणीस (नाटक- साती साती पन्नास)

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

दि. ६ डिसेंबर, २०२४ ते १८ डिसेंबर, २०२४ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. संजय दखणे, श्री. संजय कुळकर्णी आणि श्रीमती अर्चना कुबेर यांनी तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]