दापोली येथील ए.जी. हायस्कूल येथे NDRF पथकामार्फत प्रशिक्षण

दापोली येथील ए.जी. हायस्कूल येथे NDRF पथकामार्फत प्रशिक्षण

जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग यांच्या वतीने शालेय सुरक्षा विषयक प्रशिक्षण अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल ( NDRF) पुणे येथील पथका अंतर्गत प्रशिक्षण व मार्गदर्शन .

 

दापोली : शहरातील ए.जी. हायस्कूल येथे नुकतेच जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग यांच्या वतीने शालेय सुरक्षा विषयक प्रशिक्षण अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल ( NDRF) पुणे येथील पथका अंतर्गत प्रशिक्षण व मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आले.

यावेळी NDRF कमांडर प्रमोद राय यांनी नैसर्गिक आपत्ती दरम्यान बचाव आणि मदत कार्य कसे करावे व येणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला तोंड कसे द्यावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आपत्ती काळातील जखमी अवस्थेतील नागरिकांना प्रथमोपचार कसा करावा याविषयी विविध प्रात्यक्षिके दाखवली. तसेच NDRF क्षेत्रातील करिअर वाटा याविषयी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.

दापोली येथील ए.जी. हायस्कूल येथे NDRF पथकामार्फत प्रशिक्षण

या प्रशिक्षण प्रसंगी NDRF चे चीफ कमांडर प्रमोद राय यांचेसह दहा जणांची टीम उपस्थित होती. यावेळी दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोम्बे, महसूलचे नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, कृषी अधिकारी श्वेता शिंदे, कृषी विस्तार अधिकारी रोशनी जाधव, कृषी विभाग पंचायत समितीचे प्रसाद भारदे, नगरपंचायतीचे फायरमॅन नितीन इंदुलकर, प्रशांत विचारे, पोलीस डिपार्टमेंटचे निलेश पवार, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एम.कांबळे, उपमुख्याध्यापक डी.एम. खटावकर, ज्येष्ठ शिक्षक नितीन मुंडेकर ,पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी अभ्यंकर यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें