केंद्रीय मंडळाच्या इंग्रजी शाळांमधून मराठी शिकवणे बंधनकारक : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय मंडळाच्या इंग्रजी शाळांमधून मराठी शिकवणे बंधनकारक : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

मुंबई – राज्यातील केंद्रीय मंडळाच्या इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक आहे. शाळांना यातून कोणत्याही प्रकारची पळवाट काढता येणार नाही,याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना परिपूर्ण मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे,शाळांत आता मराठी विषय शिकवण्याबाबत शाळांकडून चालढकल सहन केली जाणार नाही,असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

मराठी भाषेचे अध्यापन करण्या स टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता शालेय शिक्षण विभागाची नजर राहणार आहे. याबाबत टाळाटाळ करणाऱ्या शाळांची तक्रार पालकांना आता करता येणार आहे, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शालेय शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम असलेला आणि बदलां सदर्भातील रोडमॅप तयार केला जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत शिक्षक,संस्था चालक यांच्या बैठका घेवून त्यांच्या समस्या आणि काही बदल करता येतील का या संदर्भात चर्चा करण्यात आली.

शालेय शिक्षण विभागाशी सबंधित असलेल्या अडचणी, बदल,उपाययोजना,नवे निर्णय आदीबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही ते म्हणाले. या विभागाचे नेमके काय व्हिजन असेल हे या रोडमॅप मधून सांगितले जाणार आहे.हा रोड मॅप लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दिली.इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक असल्याचा सक्तीचा कायदा असतानाही शाळा यातून पळवाट काढताना दिसत आहेत. राज्यातील खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू आहे,अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्या अनु- षंगाने मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे,असेही ते म्हणाले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के