पाटपन्हाळे विद्यालयात हिंदी भाषा विश्व दिन साजरा
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या अध्यक्षेत व मार्गदर्शनात हिंदी भाषा विश्व दिवस कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
हिंदी भाषा विश्व दिवस कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण , हिंदी विषय अध्यापिका सौ.ए.आर.चव्हाण , सौ.एस.एस.विचारे-सावंत , श्री. एस.एम.आंबेकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या हस्ते श्रीसंत कबीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवर शिक्षकवृंदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . सदर कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका सौ.एस.एस.विचारे – सावंत यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.समृद्धी सुरेश आंबेकर -इयत्ता नववी हिने केले . इयत्ता पाचवी ते नववी मधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून मनोगत व हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण , कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील तसेच हिंदी विषय अध्यापिका सौ.ए.आर.चव्हाण यांनी हिंदी भाषा विश्व दिवस साजरा करण्याचा हेतू , हिंदी भाषेचे महत्व , हिंदी भाषेची ख्याती आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमासाठी मान्यवर मुख्याध्यापक , शिक्षकवृंद व बहुसंख्य विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल हिंदी विषय अध्यापिका सौ.ए.आर.चव्हाण यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Author: Sandesh Kadam
संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक