महामानवांचे बहुजन समाजाच्या शिक्षणासाठीचे योगदान महत्त्वपूर्ण- प्रा.विजयराव मोहिते
गुहागर कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे महापुरुष व राष्ट्रमातांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात
गुहागर (प्रतिनिधी)
महामानवांचे बहुजन समाजाच्या शिक्षणासाठीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची भावना प्रमुख वक्ते अभ्यासक चिपळूण तालुक्यातील दोणवली गावचे सुपूत्र आणि मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक विजयराव मोहिते (पाली विभाग प्रमुख ) यांनी केले.त्यावेळी नवीन शैक्षणिक धोरण याविषयी त्यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजाराच्या माजी आमदार, लोकनेते, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब सभागृहात कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका गुहागर या संघटनेच्या वतीने रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता महापुरुष व राष्ट्रमाता यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.हा संपूर्ण जयंती महोत्सव कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सेवानिवृत्त पदाधिकारी सिध्दार्थ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून महापुरुष व राष्ट्रमातांच्या प्रतिमांना वंदन करून जयंती महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला यावेळी, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास खर्डे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे गुहागर तालुका शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक कैलास शार्दुल, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम प्रा डॉ.जालिंदर जाधव ,प्रा.डाॅ.आनंदा कांबळे प्रा.डाॅ.लंकेश गजभिये,प्रा.सुधीर वासनिक ॲड दिनेश कदम, इंग्रजी भाषेचे अभ्यासक शैलेश गमरे एस.एस. डी केंद्राचे प्रमुख प्रमोद पवार, संजय गमरे, हृषीकांत पवार, किरण शिंदे, पत्रकार बाबासाहेब राशिनकर, उत्तम पवार, सामाजिक कार्यकर्ते आनंद डी.पवार, संतोष पवार, उमेश पवार सुदेश हडकर ,ममता जाधव, प्रमोदीनी गायकवाड, मधुरा पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड, कार्याध्यक्ष सुधीर कांबळे, कोषाध्यक्ष सुहास जाधव, सचिव वैभवकुमार पवार व सहका-यांनी विशेष मेहनत घेतली संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव वैभवकुमार पवार केले