हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी ‘हार्टस्ट्रॉंग (Heartstrong)’ हे नवे पुस्तक प्रकाशित केले आहे. सर्वसामान्य वाचकांसाठी तयार केलेले हे पुस्तक हृदयाच्या आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करते आणि योग्य माहितीच्या आधारे जागरूकता निर्माण करते. आपत्कालीन स्थिती उद्‌भवण्यापूर्वी योग्य निर्णय घेता यावा, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

डॉ. छत्रपती यांच्या २१ वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत रुग्णांकडून वारंवार विचारले जाणारे अनेक प्रश्न या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. हृदयाच्या वेदना जीवघेण्या ठरू शकतात का, मॅरेथॉनमध्ये धावणे सर्वांसाठी सुरक्षित आहे का, घरात पाळीव प्राणी असल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो का, तसेच दिवसाला एक-दोन सिगारेट ओढणे सुरक्षित आहे का, यांसारख्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे देण्यात आली आहेत. या अनुभवांतूनच ‘हार्टस्ट्रॉंग’ या पुस्तकाची संकल्पना साकार झाली आहे.

एका घटनेचा उल्लेख करताना डॉ. छत्रपती सांगतात की ३९ वर्षीय एका रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला होता. तातडीच्या अँजिओप्लास्टीमुळे त्याचे प्राण वाचले. मात्र त्याच्या पत्नीने विचारलेला, ‘तो इतका फिट असूनही हार्ट अटॅक कसा आला?’ हा प्रश्न समाजातील गैरसमजांचे उदाहरण आहे. फिट दिसणे म्हणजे आरोग्यदायी असणे नव्हे. सिक्स पॅक अॅब्स असूनही चुकीची जीवनशैली आरोग्यास घातक ठरू शकते. याच मानसिकतेत बदल घडवण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे.

‘हार्टस्ट्रॉंग’ला डॉ. छत्रपती यांनी ‘देवाने द्यायला विसरलेले हृदयाचे ओनर मॅन्युअल’ असे संबोधले आहे. रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, ताणतणाव, झोप, आहार, सीपीआरविषयी जागरूकता आणि आधुनिक हृदयरोग उपचारांबाबतचे गैरसमज या विषयांवर पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. हे पुस्तक वैद्यकीय तज्ज्ञांसाठी नसून सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या आणि संवादात्मक शैलीत लिहिले गेले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जवळपास १.८ कोटी मृत्यू हे हृदयरोगामुळे होतात. भारतात बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धूम्रपानामुळे हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हार्टस्ट्रॉंग’सारख्या पुस्तकाची गरज अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ट्रुथ अँड सोशल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केले आहे. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरणार आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam