सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का
आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश..

मी माझा पक्ष शंभर टक्के वाढवणार –आमदार निलेश राणे
सिंधुदुर्ग —कुडाळ-मालवणचेआमदार श्री. निलेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय,सिंधुदुर्गनगरी येथे भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा भाजपला मोठा फटका बसला आहे.
तर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षातीलही कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला आहे.
लवकरच ऊबाठा गटातील आणखी कार्यकर्ते आणि नेते आपल्या संपर्कात असून लवकरच तेही प्रवेश करतील.