राजापूर गावातील शीळ येथील अखंड हरिनाम सप्ताहाला राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे व आमदार किरण सामंत यांची उपस्थिती

राजापूर गावातील शीळ येथील अखंड हरिनाम सप्ताहाला राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे व आमदार किरण सामंत यांची उपस्थिती

राजापूर (प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल)

राज्याचे मत्स व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी राजापूर शहराजवळ शीळ गावात वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा भेट दिली.

वारकरी मंडळी आपल्या वाणीतून समाज प्रबोधन करून समाजाला आकार देण्याचं काम करत असतात. आज आपल्या देशामध्ये चारही बाजूने इस्लामिक आक्रमण होताना दिसत आहे. अशावेळी हिंदू समाजाला जागृत करण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून आपण करावे असे आवाहन राज्याचे व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शिळ, राजापूर येथे केले.

यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून जे वारकरी वारकरी भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात त्यांची निवासाची सोय व्हावी म्हणून वारकरी भवन बांधण्याचे आश्वासन श्री राणे यांनी यावेळी दिले.
भाजपाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आणि राजापूर तालुका वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर यांच्या पुढाकारातून गेली चार वर्षांपासून मौजे शीळ गावी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
यावेळी प. सद्गुरू विश्वनाथ तथा भाई महाराज गोसावी यांचे अध्यात्मिक प्रवचन पार पडले.
यावेळी आमदार किरण सामंत, राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू कुरूप, पत्रकार संतोष मोंडे, भाजपाचे उपाध्यक्ष वसंत पाटील, समीर खानविलकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष अरविंद लांजेकर, तसेच राजू चव्हाण, दिपक हळदणकर, सरपंच अशोक पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नागरेकर, नामदेव नागरेकर, गोपाळ गोंडाळ, सुरेश बाईत, तहसीलदार गंबरे, तलाठी गमरे, नायब तहसीलदार गुरव मॅडम, प्रकाश कुवळेकर, योगेश नकाशे, महेश नकाशे, पत्रकार राजू बाईत, ऍड. प्रवीण नागरेकर, महेश गोंडाळ, भूषण सावंत, ग्रामस्थ, आदी मान्यवर उपस्थित होते.

Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें