विचुंबेतुन लाखोचा गुटख्याचा साठा जप्त परिसरात खळबळ
पनवेल येथील विचुंबे येथील घटना
नवी मुंबई (मंगेश जाधव)-पनवेल मधील विचुंबे येथुन गुटख्याचा मोठ्याप्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. सकाळच्या वेळी जवळपास साडे सातच्या सुमारास विचुंबे परिसरात काही सश्यास्पद हालचाली होत असल्याची माहीती गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती मिळालेल्या माहीतीच्या आधारावर त्या ठिकाणी धाड टाकण्यात आली.
. सदर परिसरात शोध घेतला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला विचुंबे गावातील एका चाळीतल्या खोलीत आढळून आलेला २०लाख ६०हजार किमंतीचा गुटखा जप्त करण्यात आला .