वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रम
गुहागर – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला
.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ शिल्पा कोळथरकर या होत्या.त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज पावसकर ,व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष संजना फुंणगुस्कर, मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गगायकवाड, अफसाना मुल्ला तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यावेळी मतदार जनजागृती विषयक प्रतिज्ञा घेण्यात आली.
त्यावेळी डॉ मनोज पाटील व सामाजिक कार्यकर्ते मनोज पावसकर यांनी मतदान हा आपला पवित्र हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क आपण बजावणे आवश्यक असल्याबाबत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन धन्वंतरी मोरे यांनी केले.