परुळे ग्रामपंचायतीच्या हळदीकुंकू समारंभात “माझी वसुंधरा” उपक्रमांतर्गत हरित भेटवस्तूचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

परुळे ग्रामपंचायतीच्या हळदीकुंकू समारंभात “माझी वसुंधरा” उपक्रमांतर्गत हरित भेटवस्तूचे आयोजन

 

✍️राजू सागवेकर /राजापूर

 

🔹माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत परुळे ग्रामपंचायतीने मकरसंक्रांत आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महिलांसाठी अभिनव हरित भेटवस्तू उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत आयोजित हळदीकुंकू समारंभात महिलांना वाण म्हणून भाजीची रोपे वाटण्यात आली.

🔹गावातील प्रत्येक महिलेला स्वतःच्या परसबागेत ताजी, आरोग्यदायी भाजी पिकवण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी “माझी परसबाग, माझा अभिमान” या ब्रीदवाक्याखाली ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला. ग्रामपंचायत सरपंच सौ. रंजनी श्रीराम सावंत यांच्या पुढाकाराने टोमॅटो, मिरची, कोबी, वांगी अशा विविध भाजीपाल्याच्या जातींची रोपे महिलांना देण्यात आली.

🔹याशिवाय, भाजीपाल्याची उत्तम निगा राखून उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या महिलांना महाराष्ट्र दिनी प्रमाणपत्र देण्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. महिलांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

🔸🔹कार्यक्रमाला गायिका श्रीमती मीनल मनोहर सावंत, परुळे जिल्हा परिषद साळेच्या शिक्षिका शुभांगी सागरे व मानसी सुर्वे, ग्रामसंघाच्या सचिव मानसी मुरारी सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री. गोलीपकर आणि श्रीमती पल्लवी सावंत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम सावंत यांनी केले.

 

*संपूर्ण गावात पर्यावरणपूरक उपक्रमाची सकारात्मक चर्चा*

 

🔹या उपक्रमामुळे गावातील महिलांना आपल्या परसबागेसाठी नवे प्रेरणास्थान मिळाले असून, ग्रामपंचायतीच्या या कल्पक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Comment

आणखी वाचा...