जैतापूर येथे पुन्हा प्राथमिक शाळा बंद आंदोलन, प्रशासनाचा अजब कारभार.
(प्रशासनाचे वारंवार विनंती आंदोलन करूनही शाळेवर नियमित शिक्षक मिळत नसल्याने पालकांचा निर्धार)
राजापुर -(वार्ताहर) – जी.प.शाळा जैतापूर नं.1 या सेमी इंग्रजी शाळेमध्ये एक पूर्णवेळ शिक्षक आणी एक सहायक शिक्षक आवश्यक असतांना गेल्या अनेक महिन्यापासून एक कामगिरी शिक्षक दिला सहाय्यक शिक्षक तेही आदलून बदलून कार्यरत होते परंतु महिनाभर एक ही सहाय्यक प.स.गटशिक्षणाधिकारी राजापूर यांच्याकडे वारंवार विनंती करूनही देखील शिक्षक मिळालेले नाहीत .
यासाठी पालक वर्ग तसेच सरपंच यांनी भेटून प्रत्यक्ष विनंती केली परंतु संबंधित विभागाने त्यावेळी चार पाच दिवसात शिक्षक देतो असे सांगून गाजर दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे
असे असल्यामुळें आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वारंवार विनंती करून आंदोलन करूनही संबंधित विभाग झोपेच सोंग घेत तर नाही ना दुर्लक्ष करत नाही ना असे असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणी पालक पुन्हा एकदा दी 7फेब्रुवारी 2025 रोजी पासून शाळा बंद आंदोलन करणार आहे.
आपल्या पाल्याना शाळेत न पाठवण्याचा निवेदन गटशिक्षणाधिकारी राजापूर यांना देण्यात आले असून दी.6 फेब्रुवारी 2025 पर्यंत शाळेला शिक्षक देण्याचे लेखी पत्र मिळाले तर शाळा बंद आंदोलनाचा फेर विचार करू आपण आमच्या मागणीचा विचार न केल्यास होणाऱ्या आंदोलनाला व पाल्याचं नुकसानीला आपण जबाबदार असाल असे शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी आणी सर्व पालक वर्ग यांनी कळविले असून याबाबत ची प्रत मा.सरपंच ग्रामपंचायत जैतापूर, मा.गटशिक्षाधिकारी राजापूर,मा.आमदार किरणजी सामंत याना देण्यात आले .आता प्रशासन याबबात काय तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे
बातमीदार- प्रशांत पोवार, राजापुर.