पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरावर निवडणूक आयोगाची धाड, ‘आप’चा आरोप!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्लीत मोठी घडामोड; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरावर निवडणूक आयोगाची धाड, ‘आप’चा आरोप!

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असताना राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यमुना नदीच्या अस्वच्छ पाण्यावरून शेजारचे हरियाणा राज्य या निवडणुकीत ओढले गेले असताना आत पंजाबलाही यात ओढले गेले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते भगवंत मान यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी निवडणूक आयोगाने धाड टाकली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही आपली बाजू मांडली आहे. पैसे वाटल्याचा आरोप झाल्यामुळे भरारी पथकाने कपूरथाला निवासस्थानी धडक दिली होती. मात्र त्यांना घरात येऊ दिले नाही.*

निवडणूक अधिकारी ओ. पी. पांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, इथून पैसे वाटप होत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. १०० मिनिटांच्या आत आम्हाला तक्रारीचे निवारण करायचे असते. आयोगाचे भरारी पथक येथे तपासणीसाठी आले होते. मात्र त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यामुळेच मला यावे लागले. भरारी पथकाला कॅमेऱ्यांसह आत जाऊ द्यावे, अशी विनंती आम्ही केली आहे.

| A team of Delhi Election officials outside Kapurthala House, New Delhi after complaint about alleged ‘cash distribution’ is received on cVIGIL app, says an official

Returning Officer OP Pandey says, ” The complaint of money distribution was received on the cVIGIL app. Our… pic.twitter.com/95d33eLEgt

— ANI (@ANI) January 30, 2025

सीव्हीजील ॲपवरून तक्रार प्राप्त झाल्याचेही पांडे यांनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतर आता ‘आप’कडून जोरदार पलटवार करण्यात येत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपाचे नेते पैसे आणि भेटवस्तू मतदारांना वाटत असताना त्यांना मोकळे सोडून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर धाड टाकण्याचे कारण काय? हे मला समजत नाही.

आज दिल्ली पुलिस के साथ चुनाव आयोग की टीम दिल्ली में मेरे घर कपूरथला हाउस रेड करने पहुँची है। दिल्ली के अंदर भाजपा वाले खुले आम पैसे बाँट रहे हैं पर दिल्ली पुलिस और चुनाव आयोग को कुछ नहीं दिख रहा है। इस सब पर कोई कार्यवाही नहीं हो रही।

एक तरिके से दिल्ली पुलिस और चुनाव आयोग भाजपा…

— Bhagwant Mann (@BhagwantMann) January 30, 2025

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही एक्सवर पोस्ट टाकत या घटनेचा निषेध केला आहे. ‘दिल्ली पोलिसांच्या समवेत निवडणूक आयोगाने माझ्या दिल्लीतील निवासस्थानी धाड टाकली. दिल्लीत भाजपाचे नेते राजरोस पैसे वाटप करत आहेत. पण हे पोलीस आणि निवडणूक आयोगाला दिसत नाही. पण आमच्यावर मात्र कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलीस आणि आयोग पंजाबींना बदनाम करत आहे, हे निषेधार्ह आहे’, अशी टीका भगवंत मान यांनी केली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी