५ फेब्रुवारी रोजी राजापूर हायस्कुल च्या भव्य पटांगणात रंगणार जादूच्या पेटीची सुरेल सांगीतिक मैफिल

५ फेब्रुवारी रोजी राजापूर हायस्कुल च्या भव्य पटांगणात रंगणार जादूच्या पेटीची सुरेल सांगीतिक मैफिल

राजापूर / प्रतिनिधी – पुरुषोत्तम खांबल

राजापूर आणि परिसरातील रसिकांना नेहमीच विविध दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणारा मित्रमेळा राजापूर नव वर्षातील पहिला कार्यक्रम रसिकांसाठी घेऊन येत आहे तो म्हणजे जादूची पेटी.
आपणा सर्वानाच परिचयाची असलेली बाजा पेटी किंवा हार्मोनियम या वाद्यचा प्रवास, इतिहास आणि त्यातून उमटणाऱ्या जादुई स्वरांनी सजलेली लोकप्रिय गाणी याचा आनंद आपण घेणार आहोत.
जागतिक कीर्तीचे हार्मोनियम वादक व संगीत संयोजक आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू हे या कार्यक्रमातील मुख्य जादूगार असणार आहेत. तसेच प्रसिद्ध श्री प्रसाद पाध्ये याची तबला साथ आणि श्री अनिल करंजवकर हे ढोलक आणि ढोलकी हे त्या दोघांना तितकीच तोला मोलाची साथ देणार आहेत.
लोकप्रिय आमदार, माजी मंत्री व महाराष्ट्र भाजप चे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण तसेच राजापूरच्या भाजपच्या प्रदेश स्तरावरील महिला नेत्या शिल्पताई मराठे, अनिकेतजी पटवर्धन यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले असून कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद वघतां काही आघाडीच्या बॅन्क व हितचिंतक देणगीदारांचेही सहकार्य मिळत आहे
हा कार्यक्रम  बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता राजापूर हायस्कुल च्या भव्य मैदानात संपन्न होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. तरी रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहात या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन मित्रमेळा राजापूर यांनी केले आहे.

Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें