महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुहागर पंचायत समितीचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचा सत्कार

आबलोली (संदेश कदम)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने गुहागर पंचायत समितीचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर ,गुहागर ता.शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्टे, महाराष्ट्र सैनिक प्रशांत साटले, विवेक शिर्के उपस्थित होते. यावेळी गुहागर तालुक्यातील कामकाजाबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी यांनी गुहागर पंचायत समिती तालुक्यातील सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून लोकाभिमुख कामकाज करेल असे आश्वासन दिले.