गटविकास अधिकारी श्री. भिलारे यांनी तेजस तेलगडे याच्या कलींगड स्टॉल च केलं उद्घाटन…

तेजस तेलगडे यांच्या कलिंगड विक्री केंद्राचे गटविकास अधिकारी भिलारे यांच्या हस्ते उद्घाटन

गुहगर गट विकास अधिकारी श्री भिलारे यांनी केले कलीगड स्टॉल च उद्घाटन

गुहागर (आशिष कर्देकर):

तेजस तेलगडे यांचं कलिंगड विक्री केंद्र उभारल्याबद्दल कौतुक करून तेजस याचा आदर्श तालुक्यातील तरूण शेतक-यांनी घ्यावा घेऊन अशाच प्रकारे अनेक तरुणांनी शेतात उत्पादित मालाची विक्री स्वतःच करण्याचे आवाहन वजा सल्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिला.

पाटपन्हाळे यथील तरूण प्रगतीशिल शेतकरी तेजस तुकाराम तेलगडे यांच्या गुहागर चिपळूण मार्गावरील पाटपन्हाळे येथील कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती,गुहागर चे गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर, कृषी विस्तार अधिकारी प्रतिक जाधव,माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी शरद भांड, ग्रामपंचायत पंचायत सदस्य पुजा पागडे, चंद्रकांत तेलगडे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. सुलभा बडद, पाटपन्हाळे सोसायटी उपचेअरमेन रामचंद्र पागडे,शेतकरी तुकाराम तेलगडे,तेजस तेलगडे,गणपत पागडे,रूपेश तेलगडे,आदित्य तेलगडे,शांताराम तेलगडे हे उपस्थित होते.

तेजस तेलगडे या तरूणाने मुंबई ला जाण्याचा मार्ग न पत्करता वडील तुकाराम तेलगडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून गेले 4-5 वर्ष आधुनिक पद्धतीने पाटपन्हाळे येथील शेतात कलिंगड व भाजीपाला लागवड करतात. वडील तुकाराम तेलगडे हे गेली 14-15 वर्ष कलिंगड लागवड करून हजारो रूपयांचे उतपादन घेत होते.आता मुलगा तेजस याला कलिंगड उत्पादनाबरोबरच विक्री करण्याचे सुचविल्यानंतर तेजस यांनी हे विक्री केंद्र उभारून विक्रीला सुरूवात केली आहे. स्वतःच्या शेतात पिकलेल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी स्वतःच गुहागर चिपळूण मार्गावर पाटपन्हाळे येथे विक्री केंद्र उभारून गेले 4-5 वर्ष कलिंगड व इतर भाजीपाल्याची विक्री करतात. श्री.तेलगडे यांचे संपूर्ण कुटुंब या शेतीवर कुटुंबाचा चांगल्याप्रकारे उदरनिर्वाह करीत आहेत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शेखर भिलारे व सहायक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी तेजस तेलगडे यांचं कौतुक केलं असून अशाच प्रकारे अनेक तरुणांनी शेतात उत्पादित मालाची विक्री स्वतःच करण्याच्या सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें