कोकणातील समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचे घरा ना कायम स्वरूपीं ७/१२ मिळावा.
???? गुहागर तालुका काँग्रेस चे विद्यमान अध्यक्ष, श्री. मिलिंद आत्माराम चाचे, यांचे शासन दरबारी प्रयत्न सुरू.
गुहागर (वार्ताहर)- गुहागर तालुका काँग्रेस चे विद्यमान अध्यक्ष, श्री. मिलिंद आत्माराम चाचे, यांनी, कोकण मधील खाडी किनारी बहुसंख्येने रहात असलेला कोळी बांधव (खारवी समाज )यांच्या घराखालील जमीन (जी प्रामुख्याने गावठाण जमीन )चा 7/12 त्यांच्या नावावर व्हावा यासाठी शासनाकडे सतत पाठ पुरावा सुरु आहे.
कारण त्यामूळे खारवी समाजास इतरत्र स्वकष्ट ने कोणतीही जमीन खरेदी केली तर, मग ती जमीन शेतजमीन असो, किंव्हा मत्स्यशेती साठी ही जमीन खरेदी केली तर ती जमीन नावावर होताना खूप अडचणी ला सामोरे जावे लागते,त्यामुळे शासनाने या समाजास शेत जमीन खरेदी निकषा बदल करावा अशी मागणी केली आहे, हीच अडचण ओळखून गुहागर तालुका काँग्रेस चे विद्यमान अध्यक्ष श्री मिलिंद आत्माराम चाचे यांनी तत्कालीन काँग्रेस नेते, आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे हा विषय पोहचवला त्यानुसार जून 2023 मध्ये माननीय श्री. अशोकराव चव्हाण साहेब यांनी तत्कालीन महसूल मंत्री, नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री मिलिंद आत्माराम चाचे यांच्या निवेदन मधील मागणी नुसार पत्र दिले त्यापत्रवरील मागणी नुसार कारवाई करताना मंत्री महोदय यांनी अप्पर मुख्य सचिव महसूल यांना खारवी समाजाची माहिती तपासून सादर करावी असे आदेश दिले होते, त्यानुसार, महसूल विभाग मंत्रालय ने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील खारवी समाजाची जमीन विषयक माहिती सादर करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार प्रत्येक गावातील खारवी समाजाची जमीन विषयक माहिती जमा करण्याचे काम तलाठी स्तरावर चालू असून खारवी समाजाने यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खाडी किनारी बहुसंख्येने रहात असलेल्या 99%भूमिहीन असलेल्या या समाजचा हा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हा प्रश्न सुटला तर या समाजास शेतकरी दाखला मिळणे सोपे होणार आहे, मत्स्यशेती करताना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे.
???? भूमिहीन असलेल्या खारवी समाजाच्या जमिनी खरेदी करून नावावर करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्याच्या मार्गांवर
???? हा प्रश्न सुटावा म्हणून गुहागर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे प्रयत्नशील….