जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे शिवजयंती, शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे शिवजयंती, शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील खोडदे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्वलन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक महत्वपूर्ण कार्याबद्दल भाषणे केली त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाराजांचे पोवाडे आणि गाणी सादर केली. यावेळी सरपंच कु. पुजा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश साळवी, शिक्षणतज्ञ विलास गुरव, माजी पोलिस पाटील रमाकांत साळवी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी, राजेंद्र पंढरीनाथ साळवी, विनायक गुरव, संतोष गुरव, शहानंद पवार, मुख्याध्यापिका प्रिता गावड, उपशिक्षिका संध्या पाटील, आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी,राजेंद्र पंढरीनाथ साळवी यांनी शाळेला रंगमंचावरील पडदे देणार असे जाहीर केले. या शिवजयंती, शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक – पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें